Black Drongo |
Black Drongo
It is named as Kotwal in Marathi, because it escapes violence behind the likes of Kara, Kavale, Sasane and protects other parties. Their length is usually about 31 cm It's so much. There is a black bird with a scarped tail. These birds live alone and sometimes live alone. Pests on crops are their food. Other parties are adept in the food they bring. The female lays 3 to 5 eggs. The period of reproduction is between April to August. This bird is found throughout India and it lives in Iran, Pakistan, Myanmar, Bangladesh, China, Sri Lanka and Indonesia.
कोतवाल
घार ,कावळे,ससाणे यासारख्या हिंस्त्र पक्षांच्या मागे लागून पळवतात आणि इतर पक्षांचे स्वरंक्षण करतात म्हणून याना मराठीत कोतवाल असे नाव आहे. यांची लांबी साधारणतः ३१ सेमी. इतकी असते. दुभंगलेली शेपूट असलेला काळ्या रंगाचा सडपातळ पक्षी आहे. हे पक्षी लहान लहान थव्याने तर कधी एकटे राहतात. पिकांवरील कीटक हे त्यांचे खाद्य आहे. इतर पक्षांनी आणलेले खाद्य हुसकाविण्यात पटाईत असतात. मादी ३ ते ५ अंडी घालते. प्रजनन करण्याच्या काळ एप्रिल ते ऑगष्ट दरम्यान असतो. संपूर्ण भारतभर हा पक्षी आढळतो इराण,पाकिस्थान,म्यानमार,बांगलादेश,चीन,श्रीलंका,इंडोनेशिया या देशात याचे वास्तव्य आहे.